काठोकाठ भरले माझे मन ।

पुष्पांजली पाटणकर

गरुडाचे पायी ठेवू
वेळोवेळी डोई ।
वेगे आणावा तो हरि ।। १ ।।

पाय लक्ष्मीच्या हाती ।
म्हणूनी आलो
काकुळती ।। २ ।।

आता तरी शेषा ।
जागे करा हृषीकेशा ।। ३ ।।

जागे झाले नारायण ।
ऐकले आमचे पारायण ।। ४ ।।

म्हणाले येऊ लवकरी ।
आता सिद्धता करावी ।। ५ ।।

आनंदाने भरीन त्रिभुवन ।
काठोकाठ भरले माझे मन ।। ६ ।।

– कृष्णपुष्प (पुष्पांजली) (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७५ वर्षे), बेळगाव (२२.६.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक