आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची स्पष्टोक्ती !
नवी देहली – दंगलींमध्ये हिंदूंचा सहभाग नसतो. ते शांतताप्रिय आहेत. हिंदु समाज ‘जिहाद’वर विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘वर्ष २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगलखोरांना धडा शिकवण्यात आला’ या विधानावर दिली. ते एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
#NDTVExclusive | “Hindus Don’t Normally Contribute To Riots”: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma (@himantabiswa) tells NDTV https://t.co/OAFsgPeH1r pic.twitter.com/Hpu9yOZG1q
— NDTV (@ndtv) December 1, 2022
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, वर्ष २००२ पासून गुजरात सरकारने राज्यात शांतता सुनिश्चित करण्यासाठी अनेक कृती केल्या. आता राज्यात शाश्वत शांतता आहे. आता संचारबंदी नाही. दंगलखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. आसाममध्येही शांतता नांदेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.