‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणांनी पुणे येथील ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभेत अवघा परिसर दुमदुमला
पुणे, १ डिसेंबर (वार्ता.) – आज औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन लोक पूजा करतात, लाखो हिंदूंवर अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण आजही चालू आहे, आम्ही टिपूला सुलतान नाही, सैतान म्हणतो. लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या अशा अनेक समस्या आज हिंदूंना भेडसावत आहेत. आज भारतात हिंदु धर्म आणि हिंदु धर्मियांवर अनेक आक्रमणे होत आहेत. यावर एकच उत्तर आहे, हिंदु राष्ट्र ! भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी मी नेहमीच करत आलो आहे. भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित केले जात नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच रहाणार आहे, असे परखड मत प्रखर हिंदुत्वनिष्ठ ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक आणि पत्रकार श्री. सुरेश चव्हाणके यांनी व्यक्त केले. ते बी.एम्.सी.सी. कॉलेज, डेक्कन येथे २८ नोव्हेंबर या दिवशी ‘राष्ट्र निर्माण संघटन, महाराष्ट्र’च्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभेमध्ये बोलत होते. या वेळी उपस्थित हिंदूंना हिंदु राष्ट्राची शपथ देण्यात आली, तेव्हा ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या जयघोषाने अवघा परिसर दणाणून गेला होता.
सभेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. या वेळी ‘हिंदु शक्तीपीठ पालघर’चे संस्थापक हिंदुभूषण श्री. श्यामजी महाराज, सामाजिक कार्यकर्ते कर्नल सुरेश पाटील, समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, भाजपचे नीलकंठ तिवारी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या वेळी सुरेश चव्हाणके यांनी हिंदूंच्या हितासाठी राज्य आणि केंद्रातील सरकार यांच्याकडे अनेक मागण्या केल्या.
हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! – हिंदुभूषण श्री. श्यामजी महाराज, संस्थापक ‘हिंदु शक्तीपीठ, पालघर’
या वेळी ‘हिंदु शक्तीपीठ, पालघर’चे संस्थापक हिंदुभूषण श्री. श्यामजी महाराज म्हणाले की, पुणे जिल्ह्यातच हिंदवी स्वराज्याचा पाया रचला होता. आज त्याच पुण्यात ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभेचे आजोजन करण्यात येत आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर, गड-दुर्गांवरील अतिक्रमण यांसारख्या असंख्य समस्यांवर एकच उपाय आहे तो म्हणजे हिंदु राष्ट्र !
भारत हे ५८ वे इस्लामी राष्ट्र होऊ द्यायचे नसेल, तर भारताला हिंदु राष्ट्र्र घोषित करा ! – कर्नल सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते
या वेळी उपस्थित असलेले कर्नल सुरेश पाटील म्हणाले की, काही वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारण्यासही लोक घाबरत होते. आज जगात ५७ इस्लामी राष्ट्रे आहेत, आपल्याला भारत हे ५८ वे इस्लामी राष्ट्र होऊ द्यायचे आहे का ? भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न धर्मांध गेल्या कित्येक शतकांपासून पहात आहेत. यालाच ‘गजवा-ए-हिंद’ म्हणतात. देशाची फाळणी हा ‘गजवा-ए-हिंद’चाच एक भाग होता. भारताला वाचवायचे असेल, तर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे, हाच एकमेव पर्याय आहे.
हिंदु राष्ट्र्र्र निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजेच समान नागरी कायद्याची मागणी करणे ! – मिलिंद एकबोटे, समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष
या वेळी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी कोटी कोटी हिंदूंच्या मनात जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी ही सभा आयोजित केल्याबद्दल सुरेश चव्हाणके यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी कोणताही त्याग करण्यास आम्ही मागेपुढे पहाणार नाही, हिंदु राष्ट्र्र म्हणजेच रामराज्य ! हिंदूंचे हित जपणारे, सगळ्यांना समान न्याय, अधिकार देणारे ते रामराज्य ! हीच रामराज्याची ओळख आहे. हिंदु राष्ट्र्राची ओळख आहे ! असे हिंदु राष्ट्र्र निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे ‘समान नागरी कायदा’ करण्याची याची मागणी करणे आहे ! या सभेच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच’, असा संकल्प करूया आणि तो तडीस नेण्यासाठी प्रयत्न करूया.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्मावरील सर्वच स्तरांवरील आक्रमणांवर एकमेव उत्तर म्हणजे हिंदु राष्ट्र ! |