बळ्ळारी (कर्नाटक) येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने पदभार स्वीकारतांना पाद्रयाला बोलावून करवला धर्मोपदेश !

शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्याचा आदेश

मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारतांना जॉय (जया) डिबोरा यांनी चर्चच्या पाद्रयाला आमंत्रित करून बायबल ग्रंथ ठेवून धर्मोपदेश घेतला

बळ्ळारी (कर्नाटक) – येथील सरकारी गर्ल्स हायस्कूलच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका जॉय (जया) डिबोरा यांनी मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारतांना चर्चच्या पाद्रयाला आमंत्रित करून बायबल ग्रंथ ठेवून धर्मोपदेश केला. यासह मुख्याध्यापिकेने स्वतःच्या खुर्चीवर पाद्रयाला बसवले. या घटनेला आता विरोध होऊ लागला आहे. शाळेतील काही शिक्षक आणि स्थानिक नागरिक यांनी या शिक्षिकेच्या विरोधात शिक्षण सचिवांसह अनेकांकडे तक्रार करण्यात केली आहे. यावर शिक्षण विभागाकडून जॉय (जया) डिबोरा यांना लिखित स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.

जॉय (जया) डिबोरा यांनी आरोप फेटाळले !

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्याध्यापिका जॉय (जया) डिबोरा म्हणाल्या की, पाद्री आले होते, हे सत्य आहे. ते माझे बंधू आहेत. पदभार स्वीकारल्याविषयी शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते; परंतु त्यांनी शाळेतील शिक्षकांना धर्मोपदेश केला नाही आणि बायबल ग्रंथ ठेवून प्रार्थनाही केली नाही.

संपादकीय भूमिका

भारतात धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंसाठीचच आहे का ? असा प्रश्‍न यातून समोर येतो !