हिंदु धर्मातील विज्ञानाचे सर्वश्रेष्ठत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कुठे बालवाडीप्रमाणे असलेले आणि संशोधन करणारे पाश्‍चात्त्यांचे विज्ञान, तर कुठे लाखो वर्षांपूर्वीच परिपूर्णता गाठलेले हिंदु धर्मातील विज्ञान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘येथे दिलेल्या खगोलशास्त्रातील एका उदाहरणावरून हे सूत्र लक्षात येईल. आकाशातील ग्रहांबद्दल विज्ञान जो शोध घेते, तो केवळ भौतिक दृष्टीने आहे. याउलट हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसमवेत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते. आधुनिक विज्ञानाच्या सर्वच शाखांच्या संदर्भात असेच आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले