शेणापासून विजेची निर्मिती भारतात का केली जात नाही ?

‘गायीच्या शेणापासून आता वीजनिर्मिती केली जात आहे. ब्रिटनमधील शेतकर्‍यांनी गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती करण्याचा पर्याय शोधला आहे. ब्रिटीश शेतकर्‍यांनी गायीच्या शेणापासून एक पावडर सिद्ध केली आहे. त्या पावडरचा वापर करून ‘बॅटरी’ बनवण्यात येत असल्याचे शेतकर्‍यांच्या एका गटाने सांगितले. ब्रिटीश शेतकर्‍यांनी केलेल्या प्रयोगात गायीच्या १ किलो शेणापासून एवढी वीजनिर्मिती झाली की, त्यावर ‘व्हॅक्यूम क्लिनर’ ५ घंटे चालवता येणे शक्य आहे.’

(२४.११.२०२१)