उत्तराखंडमधील मदरशांतील विद्यार्थ्यांना गणवेश लागू होणार !

‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा अभ्यासक्रमही शिकवणार !

मदरसा

डेहराडून (उत्तराखंड) – पुढील वर्षीपासून राज्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील सर्व १०३ मदरशांमध्ये गणवेश लागू करण्यात येणार आहे. यासह सर्व मदरशांमध्ये ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’चा (‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा) अभ्यासक्रमही शिकवण्यात येणार आहे. मदरशांतील मुलांना सरकारकडून गणवेश दिला जाईल कि विद्यार्थ्यांना स्वत:च खरेदी करावी लागेल ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सौजन्य : News18 UP Uttarakhand