गावातील अन्य मुसलमानाने सैन्याला माहिती दिल्याने तरुणाला बडर्तफ करून गुन्हा नोंद !
अजमेर (राजस्थान) – येथे मोईनुद्दीन या तरुणाने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी स्वतःचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र बनवले आणि नंतर आधारकार्डवर स्वतःच नाव मोहिन सिसोदिया दाखवून सैन्यात भरती झाला. गावातील मुसलमानाने याची माहिती सैन्याला दिल्यानंतर मोईनुद्दीने याला बडतर्फ करून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मोईनुद्दीन याचा लहान भाऊ आसिफ वर्ष २०१८ मध्ये सैन्यात भरती झाला होता. त्याचाही मोईनुद्दीन याच्या भरतीमध्ये हात असल्याचे म्हटले जात आहे.
#IndianArmy में नौकरी पाने के लिए जालसाजी करने का मामला सामने आया है. ओवरएज होने के कारण एक मुस्लिम युवक ने खुद को मरा हुआ घोषित करने के लिए धोखाधड़ी से डेथ सर्टिफिकेट बनाया. #Rajasthan @SumitSaraswatSPhttps://t.co/mLMec4w9ux
— ABP News (@ABPNews) November 22, 2022
आसिफ याच्याप्रमाणे मोईनुद्दीन यालाही सैन्यात भरती व्हायचे होते; मात्र त्याचे वय अधिक असल्याने ते शक्य नव्हते. यामुळे त्याचे वडील महंमद नूर यांनी गावाच्या सरपंचाला हाताशी धरून मोईनुद्दीन याचा वर्ष २०१८ मध्ये मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र बनवले. यानंतर मोईनुद्दीन याने शेजारील गावातील शाळेत जाऊन ९ वीमध्ये प्रवेश घेतला. या वेळी त्याने त्याचे नाव मोहिन सिसोदिया सांगून जन्मदिनांक ६ नोव्हेंबर २००१ अशी सांगितली. यानंतर त्याने येथे १२ पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मोहिन सिसोदिया या नावाने आधारकार्ड बनवले. त्यानंतर तो सैन्यात भरतील झाला. त्याच्याच गावातील गफूर खान याने सैन्याला मोईनुद्दीन याची खरी माहिती दिल्यावर त्याने केलेली फसवणूक उघड झाली.
संपादकीय भूमिकासैन्यात भरती होण्यामागे मुसलमान तरुणाचा काय उद्देश होता, याची आता सखोल चौकशी झाली पाहिजे ! |