(म्हणे) ‘हिंदूंच्या भागात नाही, तर मुसलमान भागातच चिकित्सालय उभारणार !’

गुजरातमधील काँग्रेसचे आमदार इंद्रजित परमार यांचे विधान असणारा व्हिडिओ प्रसारित

  • व्हिडिओ वर्ष २०१७ असल्याचा परमार यांचा दावा

  • धार्मिक भेदभाव करत असल्याचा आरोप फेटाळला !

कर्णावती (गुजरात) – काही मुसलमान आणि महिला यांनी अशी अफवा पसरवली आहे की, मी तुमच्या समवेत नाही; मात्र माझ्यासाठी तुम्ही माझे आई-वडील आणि अल्ला यांच्याप्रमाणे आहात. येथे उघडण्यात येणारे सरकारी चिकित्सालय जर त्या क्षेत्रात (हिंदुबहुल क्षेत्रात) भागात उघडण्यात येणार असेल, तर ते उपयोगी ठरणार नाही; कारण ते (हिंदू) खासगी चिकित्सालयांमध्ये जातात. केवळ मुसलमानच सरकारी चिकित्सालयांमध्ये जातात. (सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ मुसलमानांना होतो आणि तेच त्याचा लाभ करून घेतात, हे सत्यच परमार सांगत आहेत, हे हिंदू लक्षात घेतील का ? – संपादक) मुसलमानांनी मला मते दिली आहेत. तुमच्यामुळेच मी आमदार झालो आहे. मी तुम्हाला आश्‍वासन देतो की, ती तेथे (हिंदुबहूल भागात) चिकित्सालय बनू देणार नाही, असे विधान असलेला काँग्रेसचे आमदार इंद्रजित परमार यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला यांनी तो सामाजिक माध्यमांत शेअर केला होता. सध्या परमार विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आहेत. या व्हिडिओवर त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे की, हा व्हिडिओ वर्ष २०१७ चा आहे. माझ्यावर करण्यात आलेले धार्मिक भेदभावाचे आरोप चुकीचे आहेत.

संपादकीय भूमिका

  • व्हिडिओ कुठल्याही काळातला असला, तरी परमार मतांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंचा द्वेष करत आहेत, हे स्पष्ट होते !
  • कुठे मुसलमानांनी मते दिल्यावर त्यांच्यासाठी काम करणारे काँग्रेसचे हिंदु आमदार, तर हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून मते देऊनही त्यांच्यासाठी काम न करणारे हिंदु आमदार !