गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून गुन्हा नोंद

रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून गुन्हा

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील टीला मोड भागात ११ नोव्हेंबला दुपारी रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येथील गौसिया मशिदीमध्ये पुरेशी जागा नसल्याने रस्त्यावर नमाजपठण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या वेळी येथून ये-जा करणार्‍यांनी नमाजपठणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यावर पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

(सौजन्य : Arth Parkash TV) 

काही दिवसांपूर्वी गाझियाबादच्याच खोडा कॉलनीमध्ये उघड्यावर नमाजपठण केल्यावरून पोलिसांनी मशिदीच्या इमामाच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. उत्तरप्रदेश सरकारने रस्त्यावर नमाजपठण करण्यावर बंदी घातली आहे.

संपादकीय भूमिका

अन्य राज्यांत अशा प्रकारे गुन्हा का नोंदवला जात नाही ?