‘भारतमाता की जय’ म्हटल्यामुळे मिशनरी शाळेने विद्यार्थ्याला दिली शिक्षा !

  • गुना (मध्यप्रदेश) येथील घटना

  • ४ तास (पीरियड) भूमीवर बसवले !

  • जस्टिन आणि जास्मिना खातून या शिक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील गुना येथील ‘क्राईस्ट स्कूल’ नावाच्या एका मिशनरी शाळेत २ नोव्हेंबर या दिवशी प्रार्थनेनंतर एका विद्यार्थ्याने ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिल्यामुळे त्याला शिक्षा करण्यात आली. शाळा प्रशासनाने इयत्ता ७ वीतील या विद्यार्थ्याला या प्रकरणी केवळ धारेवरच धरले नाही, तर त्याला पुढील ४ तास (पीरियड) भूमीवरच बसवून ठेवले.

१. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ नेते आणि पालक यांनी शाळेत येऊन आंदोलन केले. वाढता विरोध पाहून शालेय व्यवस्थापनाने या प्रकरणी लेखी क्षमा मागितली, तसेच तसेच संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. पोलिसांनी जस्टिन आणि जास्मिना खातून या शिक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

२. या घटनेविषयी माहिती देतांना संबंधित मुलाचे वडील रोहित जैन म्हणाले की, त्यांच्या मुलाने प्रार्थनेनंतर ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिली. यामुळे तेथील शिक्षक संतप्त झाले. त्यांनी त्याला धमकावले आणि शिक्षाही केली. याने त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्याने घरी आल्यावर स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. आम्ही त्याचे वागणे पाहून त्याला विश्‍वासात घेऊन विचारले असता त्याने संपूर्ण घटना सांगितली.

संपादकीय भूमिका

  • राज्यात भाजपचे शासन असतांना अशा घटना घडणे अपेक्षित नाही !
  • ‘भारतमाता की जय’ म्हटल्याने शिक्षा होण्याला हा भारत आहे कि कोणता कट्टर ख्रिस्ती अथवा इस्लामी देश ? संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !