फटाक्यांमुळे होणारी शारीरिक हानी !

१. दिवाळीत फटाक्यांमुळे प्रतिवर्षी भारतात ६ सहस्र व्यक्ती दृष्टीहीन होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. बाधित व्यक्तींपैकी ६० टक्के व्यक्ती २० वर्षांखालील असतात. जगात प्रतिवर्षी फटाके आणि शोभेची दारू यांमुळे ५ लाख लोक अंध होतात.

२. फटाके फोडणार्‍यांपेक्षा बघणार्‍यांना अधिक बाधा होते; कारण स्फोटामुळे वेगाने उडणारे बारीक दगड आणि माती डोळ्यांना इजा करतात.

३. फटाक्यांतील चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट हे रासायनिक घटक डोळ्यांसाठी घातक असतात.

४. फटाके वाजवतांना त्यांच्या ठिणग्या डोळ्यांत उडाल्यामुळे अनेक मुलांना रुग्णालयात भरती करावे लागणे, तसेच फटाक्यांच्या आवाजामुळे बहिरेपणा येणे, फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन अनेकांचा मृत्यू होणे असे दुष्परिणामही होतात.

५. फटाके फुटल्यानंतर निघणारा धूर डोळे, फुप्फुसे आणि त्वचा यांना अपायकारक असतो. त्यामुळे दमा आणि ॲलर्जी यांचे प्रमाण वाढते.

६. फटाक्यांमुळे ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण होते. ते शरिराला घातक असते.

७. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० अंशापर्यंत वाढते.

(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’, वर्ष २०१९)