‘सनातन प्रभात’चा अंक रद्दीत देतांना योग्य ती काळजी घ्यावी !

‘सनातन प्रभात’च्या वाचकांना विनंती !

‘सनातन प्रभात’ हे राष्ट्र-धर्म विषयक अमूल्य माहिती देणारे नियतकालिक आहे. यात देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. वाचकांकडे हे अंक साठल्यानंतर काही वाचक ते अंक रद्दीत विकतात. रद्दीत विकलेल्या अंकांचा कागद कुठल्याही कारणासाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे त्यातील देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना होऊ शकते. त्यामुळे वाचकांनी ‘सनातन प्रभात’चे अंक रद्दीत न विकता ते ‘रिसायकलिंग’ करणार्‍यांना विकावेत, म्हणजे या अंकांच्या कागदाचा लगदा बनवून तो पुन्हा वापरता येईल. असे ‘रिसायकलिंग’ करणारे कुणी न मिळाल्यास अंक रद्दीत न विकता ‘सनातन प्रभात’च्या वितरकांकडे जमा करावेत, जेणेकरून अशा अंकाच्या माध्यमातून धर्मप्रसार करता येईल.