केरळमधील मोपल्यांच्या दंगली हा ‘जिहाद’च होता ! – अधिवक्ता कृष्ण राज, केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

‘वर्ष १९२१ मध्ये झालेल्या मोपला दंगलीची पार्श्‍वभूमी पहिल्या महायुद्धापासूनची आहे. या दंगलीमध्ये सरकारी कर्मचारी, पोलीस आणि तत्कालीन ब्रिटीश सैनिक यांवर आक्रमणे करण्यात आली अन् हिंदूंचा मोठा नरसंहार करण्यात आला. ही दंगल जवळपास ६ मास चालली. धर्मांध जिहाद्यांनी ‘ही आमची चळवळ असून हा आमचा विजय होता’, असे घोषित केले; मात्र ती चळवळ नव्हती, तर तो ‘हिंदूंचा नरसंहार’च होता. ‘मोपला दंगलींमध्ये धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार केले; मात्र ‘हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी’ हिंदूंनी हे अत्याचार सहन करावेत’, यांसारखी अनेक धक्कादायक वक्तव्ये मोहनदास गांधी यांनी केली. मोपला दंगली हा ‘जिहाद’चाच एक भाग होता, किंबहुना दंगलखोरांनीही हा ‘जिहाद’ असल्याचे मान्य केले होते.’