कोणत्याही पक्षाचे सरकार बँकेत होणारे घोटाळे रोखत नाही. याला उत्तर एकच आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये को-ऑपरेटिव्ह (सहकारी) अधिकोषांचे (बँकांचे) घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये उघडकीस आलेल्या १ सहस्र १९३ घोटाळ्यांपैकी महाराष्ट्रातील घोटाळ्यांची संख्या ८५६ इतकी आहे. वर्ष २०१९-२० मधील एकूण ५६८ घोटाळ्यांपैकी महाराष्ट्रात ३८६ घोटाळे समोर आले आहेत. वर्ष २०२०-२१ मध्ये ३२३ पैकी २१७ घोटाळे महाराष्ट्रात समोर आले आहेत.’