शोपिया (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून ग्रेनेड फेकून २ हिंदु कामगारांची हत्या

शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथील हरमन परिसरात जिहादी आतंकवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात २ परप्रांतीय हिंदु कामगार ठार झाले, तर अन्य ३ घायाळ झाले. मनीष कुमार आणि राम सागर अशी या कामगारांची नावे आहेत. हे दोघेही  उत्तरप्रदेशातील कनूज जिल्ह्यातील रहाणारे होते. या आक्रमणाचे दायित्व ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतली आहे. हे आक्रमण करणार्‍या इमरान बशीर गनी या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे. येथील एका शेडमध्ये ५ कामगार झोपलेले असतांना त्यांच्यावर ग्रेनेड फेकण्यात आले.

आतंकवाद्यांनी शोपियामध्येच १५ ऑक्टोबरला पूरण कृष्ण भट या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर लगेच या दोघा हिंदूंना ठार करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद चालू होऊन ३३ वर्षे उलटल्यानंतरही तेथे हिंदू अद्यापही असुरक्षितच आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
  • काश्मीरमध्ये प्रतिदिन १-२ जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील जिहादी मानसिकता नष्ट झालेली नसल्याने आणि अशा मानसिकतेच्या लोकांना पाक पोसत असल्याने हा आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे अपरिहार्य आहे, हे सरकारी यंत्रणांच्या लक्षात येईल, तो सुदिन !