मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातावर मेंदी काढल्यास परिणाम भोगावे लागतील !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु महासभेची ‘लव्ह जिहाद’मुळे चेतावणी !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – ‘करवा चौथ’ या हिंदु विवाहित महिलांच्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर येथे हिंदु महासभेने मेंदी काढणार्‍या मुसलमानांना चेतावणी दिली आहे. ‘मेंदीची दुकाने उघडणार्‍या मुसलमान तरुणांचे उद्देश वेगळे आहेत. त्यांच्या डोक्यात ‘लव्ह जिहाद’ आहे. त्यामुळे मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातांवर मेंदी काढल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे. वर्ष २०२१ मध्येही मुझफ्फरनगरमध्ये काही समाजघटकांकडून मुसलमानांना मेंदी काढण्यापासून रोखण्यात आले होते. या लोकांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

१. हिंदु महासभेचे सदस्य लोकेश सैनी यांनी म्हटले की, ‘लव्ह जिहाद’ला बळी पडण्यापासून आमच्या भगिनींना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या दुकान मालकांना करवा चौथचे महत्त्व आहे, त्यांच्याकडे हिंदू महिलांनी मेंदी काढण्यासाठी जावे.

२. खतौली मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनी यांनी म्हटले की, मेंदीच्या नावाखाली मुसलमान युवक ‘लव्ह जिहाद’ चालवत आहेत. अशा प्रकारची अनेक प्रकरणे घडली आहेत. माझी हिंदू महिलांना विनंती आहे की, त्यांनी एकतर घरी अथवा इतर समाजातील व्यक्तींच्या ब्युटी पार्लर (सौदर्यवर्धनालय) अथवा दुकाने यांमध्ये जाऊन मेंदी काढावी.

३. विश्‍व हिंदु परिषदेने मुझफ्फरनगरमध्ये मेंदी काढण्याची १३ दुकाने थाटली आहेत. या परिसरात मुसलमान युवकांकडून हिंदू महिलांच्या हातावर मेंदी काढली जाणार नाही, याची खबरदारी कार्यकर्ते घेत आहेत. मेंदी काढणार्‍यांची आधारकार्डद्वारे ओळख पटवण्याचाही प्रयत्नही विहिंपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

‘करवा चौथ’ म्हणजे काय ?

‘करवा चौथ’च्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला निर्जळी उपवास करतात. या सणासाठी साजश्रृंगार करत विवाहित महिला हातावर मेंदी काढतात.