चूक आणि सुधारणा

बुधवार, १२.१०.२०२२ या दिवशीच्या पृष्ठ ६ वर ‘आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात.’ या लेखात प्रसिद्ध झालेल्या खालील श्लोकातील अर्थामध्ये  एक वाक्य प्रसिद्ध करायचे राहिले आहे. ते वाक्य खाली अधोरेखित केले आहे. या चुकीसाठी उत्तरदायी कार्यकर्ते प्रायश्चित्त घेत आहेत.

योग्य लिखाण –

भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे –

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।। अ.४ श्लोक ३७

अर्थ – अर्जुना, ज्याप्रमाणे धगधगता अग्नी इंधनाला भस्मसात् करतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात् करतो.

कर्मांना म्हणजे अनेक जन्मांतील कर्मांच्या भोगणे उरलेल्या पुण्य-पापरूपी संचित फळांना नष्ट करतो. कर्मांच्या संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण ह्या तीन प्रकारांपैकी प्रारब्ध आणि क्रियमाणाविषयी आधी एका लेखामध्ये स्पष्ट केले गेले आहे. राहिले संचित. आत्मज्ञानाने संचित कसे नष्ट होईल, ते ह्या लेखात पाहू. आत्मज्ञान होण्याच्या आधीची आणि जन्मांतरांची संचित कर्मफळे आत्मज्ञान झाल्यामुळे कशी नष्ट होणार, हे समजण्यासाठी आधी कर्माचे फळ आपण भोगतो म्हणजे नक्की कोण भोगतो, हे समजून घ्यावे लागेल.