आश्विन कृष्ण द्वितीया (११.१०.२०२२) या दिवशी कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी केलेले काव्य येथे प्रसिद्ध करत आहोत.
कु. आराधना धाटकर हिला १० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
भाद्रपद मासाच्या अमावास्येला ।
सद्गुरु बिंदाआई अवतरली ।। १ ।।
कृपा करण्या या बालकांवर ।
आई जगदंबा अवतरली ।। २ ।।
तिन्ही गुरूंसह करूया या देवीची आरती ।
शरण जाऊया आम्ही या श्रीसत्शक्ति बिंदाईच्या चरणी ।। ३ ।।
असे तिचे मनोहर रूप वर्णू मी कसे ।
खरेच या अंबेचे रूप या हृदयात वसे ।। ४ ।।
कशी कृतज्ञता व्यक्त करू या आईच्या चरणी ।
कृतज्ञतेच्या अश्रूंविना शब्द नाही माझ्याकडे ।। ५ ।।
सगुण-निर्गुण रूप अनुभवत असती साधक तिचे ।
कधी सगुणातून कधी निर्गुणातून साधकांना घडवत असे ।। ६ ।।
धडपड असे त्यांची साधकांची साधना होण्या ।
उस्फूर्ततेने बोट धरून चालती त्या
साधकांना मोक्षाकडे घेऊन जाण्या ।। ७ ।।
जिचे रूप पहाताच शरणागतभाव दाटून येत असे ।
अशा या लक्ष्मीला नमन असे माझे ।। ८ ।।
भक्तीसत्संगाच्या रूपे शिकवत असे साधकांना ।
ओढ असे या आईच्या मनात उद्धारून नेण्या साधकांना ।। ९ ।।
– कु. आराधना प्रदीप धाटकर (वय १० वर्षे ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(७.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |