उत्तरप्रदेशमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीची तिच्यावरील सामूहिक बलात्काराच्या मुसलमान आरोपींवर कारवाई न झाल्याने आत्महत्या

प्रतीकात्मक छायाचित्र

आंबेडकर नगर (उत्तरप्रदेश) – येथे एका अल्पवयीन मुलीवर मुसलमानांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचे पाहून पीडित मुलगी तणावात होती. यातूनच तिने आत्महत्या केली, असा आरोप पीडितेच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी २ पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

१५ वर्षांच्या या मुलीचे १६ सप्टेंबर या दिवशी अपहरण करण्यात आले होते. अर्शद नावाच्या तरुणाने त्याच्या साथीदारासह तिचे अपहरण केले होते. १८ सप्टेंबरला ती परत घरी पोचली होती. तिने सांगितले की, तिला लक्ष्मणपुरी येथील एका उपाहारगृहात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. ‘त्या वेळी पोलिसांनी तक्रार मागे घेण्यास दबाव टाकला’, असा आरोप कुटुंबियांनी केला.

संपादकीय भूमिका

  • हे उत्तरप्रदेश पोलिसांना लज्जास्पद ! अशा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असे जनतेला वाटते !