केरळच्या ८७३ पोलिसांचे पी.एफ्.आय.शी संबंध !

धाडीच्या वेळी माहिती उघड केल्याचा आरोप !

थिरूवनंतरपूरम् (केरळ) – केरळचे ८७३ पोलीस कर्मचारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित आहेत, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून केरळच्या पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या अहवालात देण्यात आली आहे. आता या पोलिसांच्या बँक खात्यांतील व्यवहारांची माहिती गोळा करण्यात येत आहे. या अहवालामध्ये पोलिसांच्या विशेष शाखा, गुप्तचर विभाग, कायदा आणि सुव्यवस्था या विभागांतील पोलिसांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

या पोलिसांनी धाडीच्या वेळीची माहिती उघड केल्याचा आरोप आहे. याच वर्षी फेब्रुवारी मासामध्ये थोडुपुझाच्या करीमन्नूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकार्‍याने रा.स्व. संघाच्या नेत्याची माहिती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला पुरवल्याने त्याला बडतर्फ करण्यात आले होते. याच प्रकरणी मुन्नार पोलीस ठाण्यातील एका अधिकार्‍यासह तिघांचे स्थानांतर करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

असे कर्मचारी पोलीस सेवेत असणे हिंदूंसाठी आणि देशासाठी धोकादायक ! अशा सर्व पोलिसांना अटक करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासह त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !