जयपूर येथे गरब्याच्या मंडपात मुसलमान तरुणांची बलपूर्वक घुसखोरी !

बजरंग दल आणि विहिंप यांचे कार्यकर्ते पोचल्यावर पलायन !

जयपूर (राजस्थान) – येथे ३० सप्टेंबरच्या रात्री नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी गरब्यासाठी ओळख लपवून काही मुसलमान तरुण घुसले होते. याची माहिती बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर ते तेथे पोचल्यावर हे तरुण पळून गेले. यापूर्वी कर्णावती, इंदूर आणि अकोला येथे अशाच प्रकारे घुसलेल्या मुसलमान तरुणांना चोपण्यात आले होते.

जयपूरच्या नारायण वाटिका येथील उपवनामध्ये गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काही मुसलमान तरुण तेथे पोचले. ते प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांशी आतमध्ये जाण्यासाठी वाद घालू लागले होते. हे तरुण सुरक्षारक्षकांचा विरोध मोडून आता घुसले. यानंतर सुरक्षारक्षकांनी आयोजकांना याची माहिती दिली. आयोजक पोलिसांना बोलावण्यापूर्वीच बजरंग दल आणि विहिंप यांचे कार्यकर्ते तेथे पोचले. त्यांनी गरब्यासाठी जमलेल्या सर्वांची ओळखपत्रे पडताळणे चालू केले. हे पहाताच तेथे घुसलेले मुसलमान तरुण पळून गेले. विशेष म्हणजे या गरब्याच्या आयोजनातील ५ जणांपैकी २ जण मुसलमान होते. याला बजरंग दल आणि विहिंप यांनी विरोध केल्यावर या २ आयोजकांना आयोजनातून बाहेर काढण्यात आले.

संपादकीय भूमिका

गरब्यामध्ये मुसलमान तरुणच का लपूनछपून येत आहेत ? मुसलमान तरुणी आणि महिला का येत नाहीत ? याचे उत्तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ?