गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली बाटली !

राजकोट (गुजरात) – येथील खोडलधाममधील गरबा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मागील बाजूने अज्ञाताने प्लास्टिकची बाटली फेकून मारली; मात्र ती त्यांना न लागता त्यांच्यापासून थोड्या अंतरावर पडली.

बाटली फेकणार्‍याची ओळख पटू शकलेली नाही.