देहलीमध्ये हिंदु तरुणाची मुसलमान तरुणांकडून हत्या

  • चाकूद्वारे केले असंख्य वार !

  • पूर्वीच्या आक्रमणाचा खटला मागे न घेतल्यास हत्या करण्याची मिळाली होती धमकी !

  • पोलिसांकडे तक्रार देऊनही मनीषला पोलिसांनी संरक्षण पुरवले नाही !

अटक करण्यात आलेले आरोपी

देहली – येथील सुंदरनगरी भागात १ ऑक्टोबरच्या रात्री मनीष नावाच्या तरुणाची ३ मुसलमान तरुणांनी चाकूचे असंख्य वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. या आधारे पोलिसांनी आलम, बिलाल आणि फैजान यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमनस्यातून ही घटना घडली आहे. हत्येच्या वेळी येथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींपैकी कुणीही मनीष याला वाचवण्यासाठी पुढे आले नाही.

वर्षभरापूर्वी कासिम आणि मोहसीन नावाच्या तरुणांनी मनीषचा भ्रमणभाष हिसकावून त्याचा गळा आणि पोट यांवर वार केले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. तेव्हापासून कासिम आणि मोहसीन यांचे कुटुंबीय मनीषवर खटला मागे घेण्यासाठी सतत दबाव आणत होते. मनीष १ ऑक्टोबरला या खटल्यासाठी उपस्थित रहाणार होता. ‘खटला मागे न घेतल्यास मनीषची हत्या करू’, असे कासिम आणि मोहसीन यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते. याविषयी पोलिसांत आधीही तक्रार देण्यात आली होती; मात्र ‘पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही’, असा आरोप मनीषच्या कुटुंबियांनी केला. मनीषने न्यायालयात उपस्थित राहून आरोपींच्या विरोधात जबाब नोंदवला. त्यामुळे वरील ३ आरोपींनी मनीषची त्याच्या घरासमोरच हत्या केली.

  • भारताची राजधानी देहलीमध्ये एका हिंदु तरुणाची धमकी देऊन हत्या केली जाते, हे देहली पोलिसांना लज्जास्पद ! देहली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने सरकारने याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !
  • धमकीविषयी सांगण्यात येऊनही पोलिसांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हिंदु तरुणाची हत्या झाली. याप्रकरणी संबंधित पोलिसांवरही गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !