कर्णावती आणि इंदूर येथे गरब्यामध्ये मुसलमान तरुणांचा ओळख लपवून प्रवेश
कर्णावती (गुजरात)/इंदूर (मध्यप्रदेश) – कर्णावतीमधील एस्.पी. रिंग रोड येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गरबाच्या ठिकाणी दोघा मुसलमानांनी स्वतःची ओळख लपवून प्रवेश केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून चोपण्यात आले. त्यांना नंतर मैदानाबाहेर काढण्यात आले. याविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आलेली नाही, असे सांगितले जात आहे.
अहमदाबाद में गरबा खेल रहे थे मुस्लिम युवक, बजरंग दल वालों ने जमकर पिटाई कर दी.#Shorts #Garba #Viral pic.twitter.com/5A0IT5OHXD
— The Lallantop (@TheLallantop) September 28, 2022
विश्व हिंदु परिषदेचे प्रवक्ते हितेंद्र सिंह यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत आम्ही गरबा मैदानामध्ये जाऊन तेथील तरुणांची अचानक चौकशी करत रहाणार आहोत; कारण काही पाखंडी लोक हिंदु मुलींची छेड काढण्यासाठी आणि चोरी करण्यासाठीही या ठिकाणी प्रवेश करतात. गरबास्थळही त्यांच्यासाठी ‘लव्ह जिहाद’चा अड्डा बनत आहेत. हे थांबवण्याचे दायित्व आमचे आहे.
इंदूर येथे ओळख लवपून मुसलमान तरुणांची गरबा मंडपात घुसखोरी !
इंदूरच्या पंढरीनाथ चौकातील गरबा मंडपात ओळख लपवून घुसलेल्या ७ मुसलमान तरुणांना पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ते येथे गरबा खेळणार्या तरुणी आणि महिला यांचे भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण करत होते. याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संशय आल्यानंतर त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी स्वतःची ‘संदीप’, ‘बबलू’ अशी खोटी नावे सांगितली. त्यांच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर ते मुसलमान असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. त्यांना न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
संपादकीय भूमिका
|