गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून केला हिंदु तरुणाशी विवाह !

वडील ५ वा विवाह करणार असल्याने या तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह करण्याचा घेतला निर्णय !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथे रहाणारी रुखसार खातून या तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हरियाणातील फरीदाबाद येथील आर्य समाज मंदिरात हिंदु तरुण राम आशिष शर्मा याच्याशी विवाह केला. शर्मा हा गोरखपूर येथीलच रहाणारा आहे. या प्रकरणी रुखसार हिचे वडील कमालुद्दीन यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

१. या दोघांचा विवाह लावून देणारे हिंदु संघटनेचे पदाधिकारी बिट्टू बजरंगी यांनी २४ सप्टेंबरला फेसबूकवर दोघांच्या विवाहाचे थेट प्रक्षेपण केले होते. या दोघांनी मंदिरात विवाह करण्यापूर्वी न्यायालयात विवाह केला होता.

२. बजरंगी यांनी सांगितले की, कमालुद्दीन यांनी यापूर्वीच ४ विवाह केलेले आहेत आणि ते ५ वा विवाह करणार होते. निशा मदरशामध्ये शिकलेली असतांनाही तिला ते पटले नाही.  यामुळेच तिने विवाहासाठी हिंदु मुलगा निवडला.

३. याच आठवड्यात बरेली येथील रुबिना नावाच्या मुसलमान महिलेला तिच्या पतीने तलाक दिल्याने तिने हिंदु धर्म स्वीकारून तिच्या हिंदु मित्राशी विवाह केला. या महिलेला ३ मुले आहेत.