इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या २० वर्षीय तरुणीला सुरक्षादलांनी केले ठार !

हत्या झालेली तरुणी हदीस नजफी (चौकटीत)

तेहरान (इराण) – गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबच्या विरोधात आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍यांपैकी एक असणार्‍या हदीस नजफी या २० वर्षीय तरुणीची इराणच्या सुरक्षादलांनी गोळ्या झाडून हत्या केली.

कराज शहरात ही घटना घडली. तिच्यावर एकूण ६ गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्या तिचे तोंड, मान आणि छाती यांमध्ये लागल्या. इराणमधील आंदोलनात आतापर्यंत ४ महिलांसमवेत ५० लोकांचा मृत्यू झाला आहे.