(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा गुन्हा काय ?’

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा प्रश्न

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (‘पी.एफ्.आय.’चा) गुन्हा काय आहे ? असा प्रश्न समाजवादी पक्षाचे राज्यातील खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी उपस्थित केला. ‘ही संघटना देशातील अन्य संस्थांप्रमाणेच एक संस्था असून तिच्या धोरणांनुसार कार्यक्रम राबवत आहे. पी.एफ्.आय. संस्था देशातील मुसलमानांच्या समस्यांच्या विरोधात लढत आहे’, अशा शब्दांत त्यांनी या संघटनेचे समर्थन केले. या संघटनेवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी देशभरातील १५ राज्यांतील ९३ ठिकाणी धाडी टाकून १०६ जणांना अटक केली आहे.

संपादकीय भुमिका

अशा प्रकारचा प्रश्न विचारून बर्क वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत ! त्यांच्या अशा प्रश्नांना कुणीही भीक घालणार नाही; कारण देशातील सर्व जनतेला ही संघटना काय आहे, आता ठाऊक झालेले आहे !