केरळमधील बंद अवैध ! – केरळ उच्च न्यायालय

थिरुवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळात झालेल्या हिंसाचाराची केरळ उच्च न्यायालयाने स्वत:हून नोंद घेत ‘सार्वजनिक मालमत्तेची हानी सहन केले जाऊ शकत नाही’, असे म्हटले आहे. ‘अशा प्रकारे कुणीही बंद पुकारू शकत नाही. हा बंद अवैध आहे’, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेशही न्यायालयाने राज्य प्रशासनाला दिला आहे. ‘कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना कराव्यात’, असे न्यायालयाने सरकारला सांगितले.