(‘अल्लाहू अकबर’ म्हणजे ‘अल्ला महान आहे.’)
लंडन (ब्रिटन) – सध्या ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून विशेषतः पाकिस्तानी वंशाच्या मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण केली जात आहेत. ब्रिटनमधील स्मिथविक शहरात २१ सप्टेंबरच्या सकाळी मुसलमानांनी येथील एका हिंदु मंदिराबाहेर निदर्शने केली. ते ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देते होते. यापूर्वी ब्रिटनमधील लिसेस्टर शहरात मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी ४७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर एका मुसलमानाला १० मासांची शिक्षाही झाली आहे. तेथे अद्यापही तणावाचा स्थिती आहे. आशिया चषक सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर ब्रिटनमध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यात संघर्ष चालू झाला आहे.
Around 200 masked Islamists circle a Hindu Temple in Birmingham amid chants of ‘Allah-Hu-Akbar’, terrifying visuals emerge https://t.co/aWyWLZzCEb
— OpIndia.com (@OpIndia_com) September 21, 2022
१. स्मिथविक शहरातील मुसलमानांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामध्ये सुमारे २०० मुसलमान येथील ‘मुस्लिम स्पॉन लेन’मध्ये असलेल्या दुर्गा भवन मंदिराकडे जातांना दिसत आहेत. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. अधिकार्यांनी लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र काही लोक मंदिराच्या भिंतीवर चढू लागले.
२. ‘बर्मिंगहॅम वर्ल्ड’च्या वृत्तानुसार स्मिथविकमधील ‘अपना मुस्लिम’ नावाच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यावरून दुर्गा भवन मंदिराबाहेर ‘शांततापूर्ण निषेध’ करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाब्रिटनमधील हिंदूंवर होणार्या आक्रमणाविषयी भारताने ब्रिटन सरकारकडे कठोर निषेध नोंदवून त्यांच्या रक्षणासाठी कडक पावले उचलण्यासाठी दबाव टाकला पाहिजे ! एखाद्या ज्यू व्यक्तीच्या विरोधात जगात कुठेही काही झाले, तर इस्रायल लगेचच त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करतो, तसे भारताने हिंदूंसाठी करणे अपेक्षित आहे ! |