मुसलमान वर्गमैत्रिणीशी विवाह केल्याने हिंदु डॉक्टरचा जीव धोक्यात

धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या

रतलाम (मध्यप्रदेश) – मुसलमान वर्गमैत्रिणीशी विवाह केल्याने हिंदु डॉक्टरच्या  जीविताला धोका निर्माण झाला आहे. काही धर्मांध या जोडप्याला सतत त्रास देत आहेत. मूळ शहर सोडून अन्य ठिकाणी जाऊनही त्यांच्यावर जीवघेणी आक्रमणे चालूच आहेत. पोलिसांनी साहाय्य न केल्याने डॉक्टर दांपत्याने संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश पोलिसांना दिले. (जीवघेणे आक्रमण होत असलेल्या डॉक्टर दांपत्याला सुरक्षा पुरवण्याचा निर्देश न्यायालयाला द्यावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

१. उज्जैन येथील रहिवासी असलेले डॉ. डॉक्टर भरत शर्मा यांनी २ वर्षांपूर्वी त्यांच्या मुसलमान वर्गमित्र डॉक्टर मुलीशी वैदिक पद्धतीने विवाह केला. हा प्रेमविवाह त्यांच्या कुटुंबासाठी धोका ठरला.

२. काही धर्मांध त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागले. त्यामुळे दोघांना अनेकदा जागा पालटावी लागली. काही मासांपूर्वी हे डॉक्टर दांपत्य सुरक्षित जागेच्या शोधात रतलाममध्ये पोचले.

३. ते रतलामला आल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर दोनदा आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. या आक्रमणात दोघेही थोडक्यात बचावले.

४. डॉक्टर दांपत्याने अनेकवेळा पोलीस अधिकार्‍यांकडे संरक्षणाची मागणी केली. पोलीस अधिकार्‍यांनी कुठलीच सुरक्षा न पुरवल्याने डॉ. शर्मा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.

संपादकीय भूमिका

जेव्हा हिंदु तरुणी मुसलमानाशी विवाह करते, तेव्हा त्याला ‘प्रेमविवाह’ संबोधून त्याला विरोध करणार्‍या हिंदूंना डोस पाजणार्‍या निधर्मीवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?