नवी देहली – जम्मू-काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांच्या हत्या यांची चौकशी करण्याची मागणी करणार्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने याचिकाकर्ते आशुतोष टपलू यांना याचिका परत घेऊन त्यावर योग्य उपाय शोधण्यास सांगितले. आशुतोष टपलू यांचे वडील टीकालाल टपलू यांची जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या आतंकवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
Kashmiri Pandit’s Killing : Supreme Court Refuses To Entertain Plea Seeking Probe Into Murder Of Advocate Tika Lal Taploo In 1989 https://t.co/mad46a8rfa
— Live Law (@LiveLawIndia) September 19, 2022
संपादकीय भूमिकागेल्या ३ दशकांत एकाही शासनकर्त्याने काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांच्या हत्या यांची चौकशी करण्याविषयी एक शब्दही काढलेला नाही, हे लक्षात घ्या ! |