हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

मुंबई – ७५ वर्षांपूर्वी ज्यांच्या कार्यकाळात आपल्या देशाचे विभाजन झाले, तो काँग्रेस पक्ष आज ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणार्या कन्हैयाकुमारला समवेत घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे. पाद्री जॉर्ज पोनैय्या जो भारतमातेला ‘अपवित्र’ आणि फक्त येशूला मानतो, तसेच हिंदूंच्या देवतांना न मानता त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करतो, अशांना स्वतःसमवेत घेऊन राहुल गांधी यात्रा काढतात, त्या वेळी त्यांच्या उद्देशावरच प्रश्न निर्माण होतो.

अशा प्रकारे भारतमातेचा अवमान करणार्यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ? असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे देहली राज्य प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थित केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘भारत तोडो’मध्ये सहभागी जॉर्ज पोनैय्यासारखे ईसाई पाद्री !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
हे पहा –
हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की..
🟢 भारत तोडो में सहभागी जाॅर्ज पोनैय्या जैसे ईसाई पाद्री !
__________________________________
भारतात उघडपणे केली जाणारी ख्रिस्ती धर्माची सक्ती थांबवायला हवी ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस

पाद्री जॉर्ज पोनैय्या याने नुकतेच भारतमातेचा अवमान करणारे वक्तव्य केले. त्यांनी एक वर्षापूर्वीही भारतमातेला शिव्या देऊन वादग्रस्त वक्तव्ये केली होती. ज्या धरतीला आपण मातेसमान मानतो, त्याविषयी घृणास्पद वक्तव्य करणार्या या पाद्र्याची मानसिकता यातून लक्षात येते. ‘जीझसला सर्वांनी मान्य करावे’, हे थोपवण्यासाठी ख्रिस्ती सतत प्रयत्नरत आहेत. पूर्वी हे ‘इन्क्विझिशन’ (धर्मच्छळ) करायचे, आता वेगळ्या पद्धतीने जीझस आणि त्यांचा पंथ आपल्यावर लादत आहेत. आज दक्षिण भारतात तर शाळांमध्ये सुद्धा हिंदु विद्यार्थ्यांवर उघडपणे ख्रिस्ती धर्माची सक्ती केली जात आहे, हे सर्व थांबायला हवे.
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय