पुणे येथे श्री अंबामातेच्या साक्षीने हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीचे निमित्त !

हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतांना धर्मप्रेमी

पुणे, १८ सप्टेंबर (वार्ता.) – येथील अंबामाता मंदिर, सुखसागर नगर, कात्रज येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने १७ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त अंबामाता मंदिर येथे भाजप नगरसेविका सौ. मनीषा कदम आणि श्री. राजाभाऊ कदम यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त जमलेले सर्व भाविक, संघ परिवार, बजरंग दल आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आरतीनंतर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली, तसेच देवीला सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली. या वेळी एकूण ३५ ते ४० जिज्ञासू उपस्थित होते. या अभियानाच्या अंतर्गत समितीच्या वतीने ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता, फलक प्रसिद्धी असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रिया

१. सौ. मेधा जेरे – हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा ही काळजाला भिडणारी आहे. त्यातील प्रत्येक शब्द चांगला आहे.
२. श्री. राहुल चव्हाण – प्रतिज्ञा पुष्कळ चांगली होती. समितीचे कार्यही चांगले आहे. मला तुमच्या गटात जोडून घ्या.
३. श्री. राजाभाऊ कदम यांनी नवरात्रीमध्ये नऊ दिवस प्रतिदिन १५ मिनिटे ‘लव्ह जिहाद’ आणि अन्य विषयांवर प्रवचने घेण्याची मागणी केली आहे.