(म्हणे) ‘इस्लामला वाचवण्यासाठी भारतावर आक्रमण करा !’

इस्लामिक स्टेटची मुसलमानांना चिथावणी

नवी देहली – ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेने भारताच्या विरोधात उघडपणे आघाडी उघडली आहे. इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता अबू उमर-उल-मुजाहिर याने मुसलमानांना, ‘इस्लामला वाचवण्यासाठी भारतावर आक्रमण करा’, अशी चिथावणी दिली आहे. मुजाहिर याने भारतातील मुसलमानांच्या व्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथील मुसलमानांनी एकत्र येऊन भारतावर आक्रमण करण्याची चिथावणी दिली आहे.

मुजाहिर याने ३२ मिनिटांचे भाषण अरबी भाषेत प्रसारित झाले आहे. मुजाहिरच्या भाषणात भारतातील मुसलमानांना देशावर आक्रमण करण्यासाठी चिथावले जात आहे. ‘इस्लामिक स्टेटचा उद्देश भारतात इस्लामचे संरक्षण करणे हा आहे’, असे मुजाहिर याने म्हटले आहे. भारत सरकार सतत इस्लामला लक्ष्य करत असल्याचा फुकाचा आरोप मुजाहिर याने केला आहे.

संपादकीय भूमिका

अशी चिथावणी देणार्‍या या आतंकवादी संघटनेला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलणे आवश्यक !