पुणे – महिलांना शिक्षण मिळत आहे; म्हणून त्या आज व्यासपिठावर आहेत; परंतु शिक्षणक्षेत्रामध्ये महिलांना संधी अल्प मिळत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. त्याकरिता ‘स्त्री शक्ती कायदा’ महत्त्वाचा आहे.
आपल्यावर अन्याय होत नाही; म्हणून नव्हे, तर इतर महिलांवर अन्याय होऊ नये; म्हणून ‘स्त्री शक्ती कायद्या’ची आवश्यकता आहे. सामाजिक मंडळांनी पुढाकार घेऊन कायद्यासाठी व्यासपीठ सिद्ध करावे. जनतेला सहभागी करून कायदा संमतीकरिता राष्ट्रपतींकडे पाठवता येईल. ‘स्त्री शक्ती कायदा’ हा महिलांना न्यायाकडे घेऊन जाणाार आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी मांडले. त्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्त्री शक्ती सन्मान’ या कार्यक्रमात बोलत होत्या.