अनंतचतुर्दशीचे व्रत

#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh

९ सप्टेंबर २०२२ (आज) या दिवशी ‘अनंतचतुर्दशी’ आहे. त्या निमित्ताने…

१. तिथी : भाद्रपद शुक्ल चतुर्दशी
२. उद्देश : मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते.


३. व्रत करण्याची पद्धत : या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कुणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’)

हे श्री अनंता, या भारत भूमीत हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे आणि हिंदु धर्माची पताका जगभरात फडकावी, यासाठी तू आम्हाला शक्ती प्रदान कर !