उत्तरप्रदेशातील एका गावाच्या मशिदीच्या प्रवेशद्वारावर अज्ञातांनी लिहिले ‘जय श्रीराम’ !

हरदोई (उत्तरप्रदेश) – येथील बिलग्राम चुंगी गावातील मशिदीच्या प्रवेशद्वारावर अज्ञातांनी भगव्या रंगामध्ये ‘जय श्रीराम’ लिहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुसलमान गोळा झाले. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवून चौकशी चालू केली आहे. तसेच पोलिसांनी ‘जय श्रीराम’ हे शब्द पुसले.