फैजल याने हिंदु असल्याचे भासवून हिंदु योग शिक्षिकेला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

अटक करण्यात आलेला आरोपी फैजल अहमद

लक्ष्मणपुरी – शहरातील फैजल अहमद नावाच्या एका मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून योगशिक्षिका असलेल्या हिंदु तरुणीशी विवाह केल्याची आणि तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. फैजल अहमद याने ‘अथर्व’ असल्याचे भासवून पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा अश्‍लील व्हिडिओ बनवला.

१. पीडित मुलीने विवाहासाठी दबाव टाकल्यानंतर त्याने आर्य समाज मंदिरात तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर तो फैजल अहमद असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तेव्हा त्याने मुलीवर ‘इस्लाम’ स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास चालू केले.

२. मुलीने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने त्याने तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिचा अश्‍लील व्हिडिओ प्रसारित करण्याची आणि तिला जाळून मारण्याची धमकी दिली.

३. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपी फैजल अहमद याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने यापूर्वीही २ हिंदु मुलींसोबत संबंध ठेवल्याचे उघड झाले आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

सध्या हिंदु नाव धारण करून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याचे प्रकार चालू झाले आहेत. हे रोखण्यासाठी हिंदु युवतींनी सतर्कता बाळगणे आवश्यक !