आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची स्पष्टोक्ती !
गौहत्ती (आसाम) – जर देशविरोधी कारवायांसाठी मदरशांचा वापर करण्यात येत आहे, अशी आम्हाला माहिती मिळाली, तर आम्ही अशा मदरशांना पाडून टाकू, अशी स्पष्टोक्ती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांत आतंकवाद्यांशी संबंध असल्यावरून आसाममधील ३ मदरसे पाडण्यात आले आहेत. याविषयी ते बोलत होते.
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, ‘‘मदरसे पाडण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. केवळ हे स्पष्ट असायला हवे की, मदरशांचा वापर जिहाद्यांकडून केला जात नाही ना ?’ यापूर्वीही मुख्यमंत्री सरमा यांनी मदरशांविषयी विधाने केली होती. ते म्हणाले होते की, मदरशांचा वापर शिक्षणाऐवजी आतंकवादी प्रशिक्षणांसाठीचे केंद्र म्हणून केला जात आहे.
संपादकीय भूमिकादेशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रप्रेमींना अशीच अपेक्षा आहे ! खरेतर देशात शिक्षणव्यवस्था असतांना मदरसे नावाचा प्रकारच बंद करणे आवश्यक आहे ! |