‘पुनरावर्तन’ उपक्रमाच्या अंतर्गत मूर्तीदान करण्याचे पुणे महापालिकेचे धर्मद्रोही आवाहन !

‘यंदाच्या गणेशचतुर्थीला नैसर्गिक मातीचा पुनर्वापर करूया’ असे म्हणत गणेशभक्तांची घोर फसवणूक  !

पुणे – विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेकडून यंदा ‘पुनरावर्तन’ हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. यामध्ये शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती किंवा घरी मूर्ती विसर्जन केल्यास उरणारी शाडूची माती संकलित केली जाऊन त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. सर्व मूर्तीदान केंद्रांच्या ठिकाणी शाडू मातीचे संकलन करण्यासाठी व्यवस्था असणार आहे. ‘नदीमध्ये शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन केल्याने नदीच्या तळाशी गाळ साचतो ज्यामुळे समुद्री जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. मातीचा सहजपणे पुनर्वापर होऊ शकतो. मूर्तीकारांना ‘मूर्ती परत देऊन या मोहिमेत सहभागी व्हा’, असे धर्मद्रोही आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात. वहात्या पाण्यात विसर्जन करणे हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. त्यामुळे भाविकांनी भूलथापांना बळी न पडता धर्मशास्त्राप्रमाणे कृती करून श्री गणेशाची कृपा संपादन करावी !
  • वर्षभर नद्यांमध्ये होणार्‍या भयावह प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ गणेशोत्सवाच्या वेळी प्रदूषणाविषयी कृती करणारी पुणे महापालिका हिंदुद्रोहीच !