श्रीलंकेकडून भारताच्या ६ मासेमार्‍यांना अटक

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये कथित घुसखोरी करून मासेमारी केल्याच्या प्रकरणी भारताच्या ६ मासेमार्‍यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या नौकाही कह्यात घेतल्या आहेत. ऑगस्ट मासातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १० मासेमारांना याच कारणाने अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

श्रीलंका दिवाळखोरीच्या वाटेवर असतांना भारत त्याला सर्वप्रकारचे साहाय्य करत असूनही अशा प्रकारची कृती करणार्‍या श्रीलंकेला भारताने जाब विचारला पाहिजे !