तमिळनाडूतील ख्रिस्ती शाळेच्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत

तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळा सोडण्याचा प्राचार्यांचा संतापजनक सल्ला !

चेन्नई – तमिळनाडूतील तिरूवलूर जिल्ह्यात असलेल्या थिरूवलंगडू येथील सेंट जोसेफ शाळेतील शिक्षकाने एका ७ वर्षीय विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घाबरलेले पालक त्याला रुग्णालयात भरती करण्यासाठी जात असतांनाच त्याने उलटी केली आणि त्याची शुद्ध हरपली. ‘विद्यार्थी दुसर्‍या इयत्तेत शिकत असून त्याने गोंधळ घातल्याने त्याला मारहाण केली’, असे शिक्षकाने सांगितले.

या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पालक शाळेत गेले असता शाळा व्यवस्थापनाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. प्राचार्यांनी त्यांना तक्रार करण्याऐवजी ‘शाळा सोडल्याचा दाखला घ्या’, असे सांगून त्यांना अप्रत्यक्षपणे ‘चालते व्हा !’, असे सल्ला दिला. पालकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

संपादकीय भूमिका

  • या प्रकरणी ख्रिस्ती शाळेवर आरोप होत असल्याने मुख्य प्रवाहातील हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे गप्प आहेत. याऐवजी रा.स्व.संघ अथवा अन्य एका हिंदु शाळेत अशी घटना घडली असती, तर एव्हाना आकाश-पाताळ एक करून हिंदूंना वेठीस धरण्यात आले असते, हे जाणा !
  • राज्यात हिंदुद्वेष्ट्या द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजेच द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असतांना या प्रकरणी ख्रिस्ती शाळेवर कारवाई होणे शक्य नाही, हेही तितकेच खरे !