पुणे महापालिकेचे हिंदुद्रोही आवाहन !
पिंपरी (जिल्हा पुणे) – यंदाचा गणेशोत्सव आदर्श आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शहरातील सार्वजनिक मंडळे आणि नागरिक यांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी गणेशोत्सवासाठी शाडू माती, तुरटी किंवा कागदी लगदा यांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक (विघटनशील) मूर्तींना प्राधान्य द्यावे किंवा धातू, लाकूड, दगड यांपासून बनवलेल्या पुनर्वापर करता येणार्या मूर्ती वापराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
नागरिकांना करण्यात आलेली आवाहने
१. गर्दी टाळण्यासाठी विसर्जनासाठी यावर्षी कृत्रिम विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांनी घरीच किंवा परिसरात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे; म्हणजे गर्दी टाळणे शक्य होईल. (सध्याचे कृत्रिम हौद हे न्यायालयाच्या सूचनेनुसार सिद्ध केलेले नाहीत. तसेच कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती खड्डे किंवा विहिरी बुजवण्यासाठी वापरल्या जातात. हे योग्य आहे का ? – संपादक)
२. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भातील नियम आणि तरतुदी यांचे पालन करण्यात यावे. (वर्षाचे ३६५ दिवस दिवसातून पाच वेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या वेळी हे नियम कुठे जातात ? केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी प्रदूषण होते का ? – संपादक)
३. निर्माल्य आणि पूजा साहित्य नदीपात्रात अथवा तलावात न टाकता निर्माल्य कुंडातच टाकावे. (निर्माल्याच्या दानाचे आवाहन केले जाते; मात्र नंतर ते निर्माल्य कचरा किंवा डंपर यांच्या गाड्यात टाकले जाते. अशाने निर्माल्याचे काय पावित्र्य रहाणार ? – संपादक)
४. नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी परिसरामध्ये मंडळांनी शक्यतो मूर्तीदानाचे कार्यक्रम राबवावेत. राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार पाण्याचा स्रोत दूषित करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी सर्व नागरिक आणि गणेशभक्त यांनी सहकार्य करावे. (दान केलेल्या गणेशमूर्तींचा वापर अन्य कारणांसाठी केला जातो. अशाने गणेशाची कृपा होईल का ? सांडपाणी, पशूवधगृहातील रक्तमिश्रित पाणी, कारखान्यांचे घातक-विषारी पाणी थेट नदीच्या पात्रात वा नैसर्गिक जलस्रोतात सोडले जाते, हा दंडनीय अपराध नाही का ? त्यामुळेच तर प्रदूषण होते. मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही. – संपादक)
संपादकीय भूमिकापुणे महापालिकेने यापूर्वीही अनेक हिंदुद्रोही निर्णय घेतले आहे. हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणाची आठवण होणार्या महापालिकेने अन्य धर्मियांच्या संदर्भात अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस दाखवले असते का ? |