सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे व्हिडिओ !
नवी देहली – सामाजिक माध्यमांतून बांगलादेशातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक लहान मुलगा म्हणत आहे , ‘मी बांगलादेशी क्रिकेट खेळाडू सौम्य सरकार याच्याशी यासाठीच भेटू इच्छित नाही; कारण तो एक हिंदु आहे.’
‘वॉइस ऑफ बांगलादेशी हिंदू’ या नावाच्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यातील हा मुलगा मदरशांत शिकणारा आहे. त्याला पत्रकाराकडून विचारण्यात आले, ‘तुला कोणत्या बांगलादेशी क्रिकेट खेळाडूला भेटावेसे वाटते ?’ त्यावर तो म्हणतो, ‘मुश्फिकुर, मुस्तफिजुर रहमान, तासकीन अहमद आणि सैरिफुल यांना भेटू इच्छितो.’ त्यावर त्याला सौम्य सरकारविषयी विचारण्यात आले असता त्याने वरील उत्तर दिले.
” Soumya Sarkar is a Hindu cricketer, I don’t want to meet him ” . When a Bangladeshi madrasa boy is asked which Bangladeshi cricketer he would like to meet. Then the boy answered. pic.twitter.com/NGsHgt5pvS
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) August 18, 2022
संपादकीय भूमिकापाकिस्तान असो कि बांगलादेश, मुसलमानांना लहानपणापासूनच हिंदूद्वेष शिकवला जातो, हेच यातून पुन्हा सिद्ध होते ! याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी गांधींच्या तीन माकडांप्रमाणे वागतात ! |