न्यायालयाच्या आदेशानंतर मुलीला महिला केंद्रात पाठवले
शहिदाबाद (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील शहिदाबाद या शहरात करीना कुमारी या अल्पवयीन हिंदु तरुणीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर करण्याची घटना घडली. यानंतर तिचा खलील नावाच्या मुसलमान तरुणाशी विवाहही लावून देण्यात आला. या प्रकरणी करीना यांच्या वडिलांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट करून मुलीला त्यांच्या कह्यात देण्याची मागणी केली आहे. सध्या न्यायालयाच्या आदेशानंतर या मुलीला महिला केंद्रात पाठवण्यात आले आहे. करीनाच्या अपहरणानंतर हिंदु संघटनांनी आंदोलनही केले होते.
Pakistani Hinuds: पाकिस्तान में नाबालिग लड़की ‘करीना’ का अपहरण के बाद जबरन धर्मांतरण, खलील से कराया गया निकाह, नहीं थम रहा हिंदुओं पर अत्याचार#Pakistan #HinduGirls https://t.co/mcMbpZtpgx
— India TV Hindi (@IndiaTVHindi) August 13, 2022
१. अपहरणानंतर काही दिवसांनी करीना हिने सामाजिक माध्यमांतून तिचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यात तिने तिला बलपूर्वक मुसलमान बनवण्यात आल्याचे आणि एका खोलीत बंद करून अत्याचार करण्यात येत असल्याचे सांगितले होते. तिला तिच्या आई-वडिलांसमवेत रहायचे असल्याचेही तिने यात म्हटले होते.
२. करीनाचे वडील सुंदरमल यांनी सांगितले की, आम्ही फार गरीब आहोत. मुलीच्या व्हिडिओनंतर न्यायालयाने मुलीला आमच्या कह्यात दिले पाहिजे, तसेच तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्यांना शिक्षा दिली पाहिजे; कारण ते अशा मुलींची नंतर विक्रीही करतात.
३. सुंदरमल यांचे अधिवक्ता दिलीप कुमार मंगलानी यांनी सांगितले की, करीना अल्पवयीन आहे. सिंधमध्ये बहुतांश अल्पवयीन हिंदु मुलींना लक्ष्य केले जाते. अशा वेळी पोलीसही साहाय्य करत नाहीत. आरोपी न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर करतात. याच वर्षी मार्चमध्ये ३ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि नंतर विवाह करण्यात आला. या तिघांना पोलीस अद्याप शोधू शकलेले नाहीत.
संपादकीय भूमिकापाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांतील हिंदूंविषयी भारत सरकार मौन बाळगते, तर भारतातील मुसलमानांच्या विरोधात काहीही होत नसतांना इस्लामी देश भारताला जाब विचारतात ! |