अवैध पशूवधगृहांच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट करणारे हिंदुत्वनिष्ठ नेते देवेंद्र तिवारी यांनाही जिवे मारण्याची धमकी !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील अवैध पशूवधगृहांवर बंदी आणण्याची मागणी करणारी जनहित याचिका प्रविष्ट करणारे हिंदुत्वनिष्ठ नेते देवेंद्र तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये तिवारी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे.
सीएम योगी को जान से मारने की धमकी मिली।
ज्यादा जानकारी दे रहे हैं आजतक संवाददाता @aap_ka_santosh #ATVideo #UttarPradesh| @shubhankrmishra pic.twitter.com/juqjfw5sPc— AajTak (@aajtak) August 13, 2022
देवेंद्र तिवारी यांना मिळालेल्या पत्रात लिहिले आहे, ‘‘देवेंद्र तिवारी, तुला किती वेळा समजावले आहे; परंतु तरीही तू ऐकत नाहीस. तुझ्या जनहित याचिकेमुळे मुसलमानांच्या पोटावर पाय येत आहे. यामुळे सर्व पशूवधगृहे बंद पडले आहेत. आता तू पहा, तुझे काय हाल होतात ते ! तू देवबंदमधून तरी चतुराईने निघून गेलास; पण आता तुला आणि योगी आदित्यनाथ यांना बाँबने उडवून टाकू. पुढील १५ दिवसांत तुला याचा परिणाम पहायला मिळेल. अन्यांचा शिरच्छेद करण्यात आला; पण तुम्हा दोघांना बाँबने उडवून टाकू !’’
या पत्रात पुढे लिहिले आहे की, तुम्ही लोकांनी (हिंदूंनी) आमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि मौलाना मदनी यांना त्रास दिला आहे. त्यांच्या एकेका अश्रूचा आम्ही लोक (मुसलमान) सूड उगवू.
संपादकीय भूमिका
|