इ.व्ही.एम्. यंत्राऐवजी मतदान पत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

(‘इ.व्ही.एम्.’ म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’)

नवी देहली – इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनऐवजी मतदान पत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, यात कोणतीही गुणवत्ता दिसून येत नाही.

अधिवक्ता मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते की, लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम ६१(अ) मध्ये मतदान पत्रिकेऐवजी इ.व्ही.एम्.द्वारे मतदान करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हेच मुळात चुकीचे आहे; कारण या तरतुदीला संसदेने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे इ.व्ही.एम्.द्वारे आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुका अवैध आहेत. सर्व निवडणुका मतदान पत्रिकेद्वारे घेतल्या पाहिजेत.