‘विवेकानंद ट्रस्ट’च्या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७० सहस्र राख्यांचे संकलन !

‘विवेकानंद ट्रस्ट’च्या देश रक्षाबंधन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर

कोल्हापूर, १० ऑगस्ट (वार्ता.) – कारगील युद्धापासून गेली २३ वर्षे ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ हा देश रक्षाबंधनाचा उपक्रम ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’ राबवत आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून जमा झालेल्या राख्या प्रदान करण्याचा सोहळा महासैनिक दरबार सभागृह येथे ९ ऑगस्ट या दिवशी वातावरणात पार पडला. या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७० सहस्र राख्यांचे संकलन करण्यात आले. प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव श्री. राजेंद्र मकोटे यांनी केले.

या प्रसंगी सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिवाजीराव पोवार म्हणाले, ‘‘भारतमातेच्या रक्षणासाठी कारगील युद्धात लढतांना कोल्हापूर येथून आलेल्या राख्यांनी लाख मोलाचे आत्मिक बळ वाढवले.’’ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘देशाच्या विविध सीमांवर लढणार्‍या सैनिकांना मिळणार्‍या या राखांच्या धाग्यातून देशभक्तीचाच प्रत्यय येतो.’’ या प्रसंगी वीरमाता लक्ष्मीबाई सीताराम पाटील, सुभेदार मेजर एन्.एन्. पाटील, माजी परिवहन सभापती सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, ‘रोटरी क्लब कोल्हापूर रॉयल’च्या सविता पाटील, कारगील युद्धात प्रत्यक्ष सहभाग असलेले सैनिक जोतिबा गावडे, सुनील चौगुले, उमेश पाटील यांसह अन्य उपस्थित होते.