उत्तरप्रदेशच्या सीतापूर येथील घटना
(सर तन से जुदा, म्हणजे शिर धडापासून वेगळे करणे)
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील सीतापूर जिल्ह्यात असलेल्या ‘बडी संगत’ संप्रदायाचे महंत बजरंग मुनी यांना भ्रमणभाषवरून ‘सिर तन से जुदा’ची धमकी देण्यात आली आहे. मंहंतांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सअॅपद्वारे हा संपर्क करण्यात आला होता. धमकी देणार्याचे नाव हे मौलाना मुश्ताक खान असे असून ३ ऑगस्ट या दिवशी महंतांना धमकी देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
महंत बजरंग मुनी यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे की,
१. मी स्थानिक क्षेत्रामध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण करणार्या घटनांच्या विरोधात आवाज उठवत आलो आहे.
२. यामुळे १ वर्षापूर्वी काही मुसलमानांनी माझ्यावर शस्त्रांद्वारे आक्रमण केले होते. माझ्यावर अजूनही उपचार चालू असून मी चालूही शकत नाही.
३. काही मासांपूर्वी ‘अल्ट न्यूज’च्या महंमद जुबेर याने माझ्या विरोधात टीका करून जगभर मला अपकीर्त केले होते. मला त्याने ‘हेट माँगर्स’ (द्वेष पसरवणारी व्यक्ती) म्हणून हिणवले होते.
४. देशात ‘सिर तन से जुदा’संबंधी घटना घडू लागल्यापासून माझ्या जिवितालाही धोका निर्माण झाला आहे.
५. महंतांनी माहितीत सांगितले की, ज्या क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला होता, त्यावर ‘मक्का-मदिना’चे ‘डीपी’ (डिस्प्ले फोटो म्हणजेच व्यक्तीची ओळख दर्शवणार्या छायाचित्राचे स्थान) आहे.
संपादकीय भूमिका
|